About Us

मनिषा वधु-वर मंडळ

मनीषा वधु-वर मंडळामध्ये आपले स्वागत आहे, जोडीदार शोधणार्‍यांसाठी उत्तम विवाह साईट! मनीषा वधु-वर मंडळ 2022 पासून व्यक्तींना त्यांचे जीवनसाथी शोधण्यात मदत करत आहे. मनीषा वधु-वर मंडळ अॅप अत्यंत विश्वासार्ह आहे आणि सुसंगत जीवनसाथी शोधत असलेल्या असंख्य वधु-वरांसाठी प्राधान्याचा पर्याय आहे.

आयडी प्रूफच्या पडताळणीनंतरच ग्रुपमध्ये प्रवेश दिला जातो. आमच्याकडे पश्चिम महाराष्ट्रात (सांगली, कोल्हापूर, सातारा, कराड, सोलापूर, पुणे, मुंबई) तसेच कर्नाटकातील काही (बेंगळुरू, बेळगाव) उल्लेखनीय स्थळे आहेत.

मनीषा वधु-वर मंडळामध्ये सॉफ्टवेअर/आयटी व्यावसायिक, एमबीए, अभियंते, डॉक्टर, आयएएस/आयपीएस/आयसीएस अधिकारी, चार्टर्ड अकाउंटंट, बँकर्स, प्राध्यापक, व्याख्याते, व्यापारी, पायलट, संरक्षण अधिकारी, वकील आणि अनेकांसह अनेक व्यावसायिक प्रोफाइल असतात. अधिक शिक्षण आणि व्यावसायिक पार्श्वभूमी यासारख्या मूलभूत फिल्टर्स आहेत. मनीषा वधु-वर मंडळ सर्व वयोगटातील व्यक्तींना,त्यांना त्यांचा जीवनसाथी शोधण्यात मदत करते.

मनिषा कुलकर्णी यांच्याविषयी

मी सौ. मनिषा राजीव कुलकर्णी रहाणार विश्रामबाग सांगली. मी मार्च 2022 ला ब्राह्मण समाजाला मदत म्हणुन हे कार्य मोफत चालु केले. बघता बघता members पण वाढत गेले व बरीच लग्न पण जमुन आली. एकटीला manually सर्व handle करणे शक्य नसल्याने आता ह्या ॲप च्या माध्यमातुन किरकोळ फी घेऊन सेवा देत आहे. पारंपारिक पद्धतीत बराच वेळ खर्च होतो व निर्णय होण्यासही विलंब होतो.

सदर ॲपच्या माध्यमातून कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त सुयोग्य, उच्च शिक्षित, देश तसेच परदेशातील स्थळे त्वरित व घरच्या घरी पहावयास मिळतील. यातून सर्वांचाच वेळ, श्रम व पैसा निश्चितच वाचेल, त्याचप्रमाणे समाज एकसंघ राहण्यासही मदत होईल. याशिवाय मी एक योगशिक्षिका आहे. माझे online व offline योगा क्लासेस आहेत. रोगानुसार आसन व प्राणायाम असा concept आहे. कितीतरी ladies व्याधीमुक्त झाल्या आहेत व परदेशातुन पण क्लासला joining आहे.मनीषा वधु-वर मंडळ का निवडावे?

मनीषा वधु-वर मंडळावर तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातील तसेच इतर विविध शहरांमधून वर आणि वधु शोधू शकता. मनीषा वधु-वर साइटवर आवडी, स्थान, व्यवसाय, वय आणि जात यासारखे शोध फिल्टर दिले आहेत.

सुरक्षित वैवाहिक साइट

एक वैवाहिक साइट जी सुरक्षित आणि सत्यापित प्रोफाइलसह जीवनसाथी शोधण्यायोग्य वेबसाइट आहे .

वधु आणि वर फोटो प्रोफाइल

आमच्या वैवाहिक साइटवर तुमचा जीवनसाथी शोधण्यासाठी तुम्ही आमच्या हजारो भारतीय आणि NRI प्रोफाइलच्या विस्तृत डेटाबेसमधून ब्राउझ करू शकता.

गोपनीयता

आपल्या परवानगीने तुमचे संपर्क तपशील केवळ आमच्याकडे असलेल्या सदस्यांनाच दिसतील

Choose by Age,Income, Location and other relevant filters

Story

Our Success Stories

मृण्मयी कुलकर्णी & सौरभ जोशी

Married

मनिषा वधुवर चे आभार

केतकी कुलकर्णी & श्रेयश पुजारी

Married

मनिषा वधुवर मंडळाचे आभार

Dr Aniruddha Kulkarni कागल & Dr . Manasi Deshpande कराड

Married

कागल सारख्या गावात मुली यायला तयार नव्हत्या पण तुम्ही मुली कडच्यांना आमचे स्थळ सुचवले व योग जुळून आला. धन्यवाद

अनुप्रिता कुलकर्णी & श्रेयश कागलकर

Married

मनिषा वधुवर मुळे एक चांगले स्थळ मिळाले. आम्हाला तुमच्या संस्थेविषयी खुप आदर व विश्वास आहे.

चैत्राली कवठेकर & स्वप्निल देशपांडे

Married

खुप खुप धन्यवाद

प्रणोती घाटे & अभिजीत कुलकर्णी

Married

मनिषा वधुवर चे मनापासुन आभार

Testimonials

What Are They Saying About Us

...
पद्मजा कुलकर्णी. 1994 BCA

खुप छान स्थळे आहेत. Thanks Manisha Madam

...
तेजस बंड 1993 BE. Own business

मनिषा वधु वर .. अतिशय उत्तम आणि चोखपणे आपलं काम सामाजिक भान ठेऊन करीत आहे . App किंवा Website .. सोप्या पद्धतीने कशा प्रकारे वापरायचे याच्या संबंधीची मदत तत्परतेने मिळते . इथे असलेल्या स्थळांसंबधी विश्वास वाटतो, अनुभव चांगला आहे ... त्यांना या कामासाठी शुभेच्छा🙏🏻

...
समीर सतीश कुलकर्णी

उत्तम स्थळे मिळणारी संस्था. आपल्या कार्यास शुभेच्छा.

...
Renuka Mahajan

आपल्या संस्थे विषयी खूप काही लिहिता येईल. मी मरावाड्यातला आहे. परंतु आपल्या संस्थे मुळेच मला पश्चिम महाराष्ट्रातील स्थळांची सविस्तर माहिती मिळाली. तसेच प्रश्नाला आपण लगेच प्रतिसाद देतात. खूप चांगली सेवा मिळत आहे. आपल्या ऍप मध्ये खूप चांगली स्थळ आहेत.परंतु मी मुली साठी हैदराबाद / बेंगलोर ला नौकरी करणारा मुलगा शोधत आहे त्यामुळे वेळ लागत आहे .

...
ऋजुता प्रभुणे

उत्तम व विश्वासार्ह विवाह संस्था.

...
शारंग भेडसगांवकर

वधु वर संस्थेत पैसे भरा व आपापले स्थळे शोधा असेच चित्र सगळीकडे आहे. पण मनिषा वधुवर मध्ये मात्र पैश्यापेक्षा लग्न होणे त्यासाठी out of way जाऊन मदत करणे ह्या गोष्टी अनुभवायला मिळत आहेत. लवकरच मला ही अनुरूप जोडीदार ह्याच संस्थेतुन मिळणार ह्याची खात्री आहे. Thanks Manisha Madam.

...
सुकन्या श्रीराम जोशी

मी सुकन्या जोशी . नुकतेच मला मनिषा मॅडम चा सततचा फॉलोअप आणि योग्य जोडीदार एकमेकांना मिळावा या साठी असलेली तळमळ यातूनच मला मनासारखा जोडीदार मिळाला. जोशी आणि ठाणेदार कुटुंबाकडून मनीषाला खूप खूप धन्यवाद🙏🙏

...
Savani Deshpande

हल्ली विवाह जुळवणा-या अनेक संस्थांचे पेव फुटले आहे. हा एक बिझनेसच झाला आहे. पण या क्षेत्रात माझीच पुतणी असलेली मनिषा अत्यंत निस्पृहपणे व निस्वार्थपणे केवळ आपल्या समाजातील या ज्वलंत व अवघड विषयात काम करीत आहे हे कळाले व विषय खुप सोपा झाला.

Contact

Need Help? Contact Us

Our Address

Chankya Puri,Vishrambag,Sangli

Opening Hours

Mon-Sat: 11.00 am to 6.00 pm; Sunday: Closed